पुणे - पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी, रस्त्यांची कामे लवकर करावीत

रमेश मोरे
गुरुवार, 14 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील वैकुंठभुमी स्मशान भुमीचे काम गेली चार पाच महिन्यांपासुन सुरू असल्याने पिंपळे गुरव व परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी ईतर ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभुमीचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, याचबरोबर पिंपळे गुरव अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्मशानभूमी व रस्त्यांची कामे लवकर पुर्ण करावीत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आली आहे. निवेदनात म्हटले आहे की,गेली चार पाच महिन्यांपासुन येथील स्मशानभुमीचे काम सुरू असल्याने पिंपळे गुरव,नवी सांगवी परिसरातील नागरीकांना अंत्यविधी साठी ईतरत्र जावे लागत आहे.यामुळे सर्व सामान्य नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.याचबरोबर परिसरातील रस्त्यांची खोदकामे  सुरू असल्याने नागरीकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यांच्या कामामुळे बस वहातुकीत बदल केल्याने विद्यार्थ्यांना ऐन शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या काळात शाळा,महाविद्यालयात जाण्यासाठी ईतरत्र ठिकाणी जावुन शाळा महाविद्यालय गाठावे लागणार आहे.तर खोदकामामुळे चाकरमानी वर्ग,कामगार यांना कामावर जाण्यासाठी रस्त्यांच्या कामामुळे अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या कामामुळे होणारी वहातुककोंडीमुळे अनेकदा नागरीकांना कामावर जाण्यास उशीर होतो.येथील स्मशानभूमी व रस्त्यांची कामे लवकर पुर्ण करावी असे निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: demand for complete the work of graveyard and road in pimpale gurav pune

टॅग्स