भोर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही बंद जाहीर करण्याची होतीये मागणी कारण...

विजय जाधव
Sunday, 13 September 2020

ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. यामुळे भोर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहा दिवसांचा बंद जाहीर करण्याची मागणी होत आहे.

भोर (पुणे) : तालुक्‍याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. यामुळे भोर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहा दिवसांचा बंद जाहीर करण्याची मागणी होत आहे. तालुक्‍यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, भोर शहर रविवारपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने पहिल्या दिवशी शांतता होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

तालुक्‍यातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप आदी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली. या वेळी ग्रामीण भागातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोरचे सभापती श्रीधर किंद्रे, कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, शिवसेनेचे अमोल पांगारे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, सुनील पांगारे आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाने शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. प्रशासनाने अशी गावेही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकांनी रविवारी दुकाने बंद ठेवली. यामुळे परिसरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. 
 

 

भोर तालुक्‍यात ज्या गावांमध्ये पंधरापेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर 
करून गावातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. 
-राजेंद्रकुमार जाधव, प्रांताधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for declaration of closure in rural areas of Bhor taluka