बिडी उत्पादनावरील छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटवा, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीला दिलेले नाव हटविण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून शिवाजी बिडीचं उत्पादन होत आहे. या शिवाजी बिडीचे नावं बदलण्यासाठी 1975 साली आंदोलन झाले. त्यावेळी या बिडीचे नाव बदलून संभाजी बिडी ठेवण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील नाव बिडीला देऊ नये या मागणीसाठी आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केले आहे.

पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीला दिलेले नाव हटविण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बिडीवरून हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपेठ गावात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक काटे, आणि मच्छिन्द्र टिंगरे, सुनील पालवे, रवी पडवळ, सागर पोमण, दिनेश ढगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

संभाजी बिडी हे नाव बदलल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. तसेच जर नाव लवकरात लवकर हटविले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू अशी भूमिका यावेळी उपोषणकर्त्यांनी मांडली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for deletion of Chhatrapati Sambhaji Maharaj's name on BD product