Pune : बांधकाम साहित्याची मागणी वाढली; जस्ट डायलच्या ग्राहक सर्व्हेतील निष्कर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

बांधकाम साहित्याची मागणी वाढली; जस्ट डायलच्या ग्राहक सर्व्हेतील निष्कर्ष

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बांधकाम क्षेत्रातील उलाढाली आता जोर धरत आहेत. त्यामुळेच बांधकाम साहित्याची मागणी आणि त्याबाबतची चौकशी मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती समोर आली आहे.

बांधकाम क्षेत्राची स्थिती समजून घेण्यासाठी ‘जस्ट डायल’ने केलेल्या ग्राहक सर्व्हेतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या क्षेत्राची अर्थव्‍यवस्था सुरळीत होण्‍यासोबत ग्राहकांच्‍या भावनांमध्‍ये देखील बदल होत आहेत. प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये बांधकामांना गती मिळाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्‍यासाठी मागणी वाढली आहे. वाळू, एमएस (माइल्‍ड स्‍टील) पाइप आणि रेडी-मिक्‍स काँक्रीटसाठी डिलर्सचा शोध घेण्‍याचे प्रमाणात वाढले आहे. देशात सर्वांत जास्त मागणी चेन्‍नईमध्‍ये आहे. तर द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मागणी किरकोळ वाढीसह स्थिर असल्याचे या सर्व्हेत नमूद आहे.

प्रथम श्रेणीच्‍या शहरांमधील वाळू डिलर्ससाठी शोधांमध्‍ये वर्षानुवर्षे १३ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली. एमएस पाइपसाठी ९ टक्‍के आणि रेडी-मिक्‍स काँक्रिट डिलर्ससाठी ८ टक्‍के वाढ झाली. या ट्रेण्‍डबाबत जस्ट डायलकडून सांगण्यात आले की, ‘‘आपण अशा टप्‍प्‍यामध्‍ये आहोत जेथे सामान्यतः: गृहनिर्माण बांधकाम कामांची वाढ झाल्याचे दिसते. प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मागणी वाढलेली असताना द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील शोधामध्‍ये देखील किरकोळरित्या वाढ आहे. या ट्रेण्‍डमधून देशातील या क्षेत्राची स्थिती रुळावर येत असल्‍याचे दिसून येते.

हेही वाचा: मुलांचं कोरोना लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत लवकरच निर्णय?

ही आहेत सर्वाधिक मागणी असलेली शहरे :

चेन्‍नई, मुंबई व बेंगळुरू हे तीन आघाडीची प्रथम श्रेणीची शहरे आहे. जेथे वाळू डिलर्ससाठी अधिक मागणी दिसून आली आहे. त्‍यानंतर पुणे, हैदराबाद, दिल्‍ली, कोलकता व अहमदाबाद या शहरांचा क्रमांक आहे. तर द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये कोयंबतूर, पटणा, विशाखापट्टणम, म्‍हैसूर व गोवा या पाच शहरांमध्‍ये सर्वाधिक मागणी आहे.

बांधकाम साहित्य - सर्वाधिक मागणी असलेले शहरे

- एमएस पाइप - दिल्‍ली

- रेडी-मिक्‍स काँक्रिट - हैदराबाद

- सिमेंट - दिल्‍ली

वस्तू व सेवा - मागणीत झालेली वाढ (टक्क्यांत)

- वाळू वितरक - १३

- एमएस पाइपसाठी - ९

- रेडी-मिक्‍स काँक्रिट वितरक - ८

शहरांची वर्गवारी :

प्रथम श्रेणीतील शहरे - पुणे, दिल्‍ली, मुंबई, बंगळूर, चेन्‍नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकता

द्वितीय श्रेणीची शहरे - कोयंबतूर, इंदर, नागपूर, म्‍हैसूर, चंडीगड, लुधियाना, जयपूर, पटणा, बरेली आणि लखनौ

loading image
go to top