ई टॉयलेट निःशुल्क करण्याची मागणी

मिलिंद संधान
मंगळवार, 19 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सॅमटेक क्लिन अॅण्ड क्लिअर सिस्टिमच्या वतीने ई टॉयलेट सुविधा सुरू होत असताना आता त्याला स्थानिकांकडून विरोध होत असल्याचे दिसू लागले आहे. सौदागरातील कोकणे चौकात या आठवडाभरात हा पायलट प्रोजेक्ट नाममात्र शुल्क रूपये पाच आकारून सुरू होत आहे. या शिल्क आकारणीला स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी विरोध दर्शविला आहे.   

सामान्य नागरिकांकडून वर्षाला 'मलप्रवाह सुविधा लाभकर' वसुल केला जात असताना मग या ई टॉयलेट करीता पैसे भरण्याचे कारण काय? असा प्रश्न या नगरसेवक पतीपत्नींकडून महापालिका प्रशासनाला एका पत्रकाद्वारे विचाला आहे. त्यामुळे कोणतेही शुल्क न आकारता दोन किमी लांबीच्या लिनियर गार्डन मध्ये किमान तीन स्वच्छता गृह बांधण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

Web Title: Demand for free toilet