बायसिकल शेअरिंग चिंचवड परिसरात राबविण्याची मागणी

ज्ञानेश्वर भंडारे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात सायकल सुविधा योजना (बायसिकल शेअरिंग) राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यासह क्षेत्रीय पायाभूत सुविधा तत्त्वावर निश्‍चित केलेल्या ४५ ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी सायकल प्रायोजक कंपन्या आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

यात चिंचवड, रावेत बीआरटी, आकुर्डी स्टेशन येथे सायकल शेअरिंगची काही स्थानके पहिल्या टप्प्यात व्हावीत अशी नागरिक सोशल मिडियामधून मागणी करत आहेत. वाल्हेकरवाडी जवळ असणारी रावेत, स्टेशन आणि परिसरातील शैक्षणिक संस्था, चिंचवड येथील शैक्षणिक संस्था, भाजी मंडई, असे भोगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या द्रुष्टीने सर्व घटक सायकल शेअरींगसाठी उत्कृष्ट आहेत. 

सध्या रावेत ते वाल्हेकरवाडी हा 34.5 मीटर रस्ता हो होत आहे तेव्हा या रस्त्यावर ह्या सायकल स्टेशन ची बांधणी होऊ शकते. या भागात पर्यावरणा वर काम करणाऱ्या संस्थांचे जाळे ही भक्कम आहे. तेव्हा सायकलचा प्रसार ही वेगाने होईल. सन्माननीय सदस्यांनी आपल्या भागात हे आधुनिक यंत्रणा पहिल्या ठप्यात येण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Demand for implementation of cyclel sharing in Chinchwad area