दौंड : भुयारी मार्गाचा निधी अन्यत्र वापरल्याने विभागीय चौकशीचा प्रस्ताव

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक गौतम साळवे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. 

दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक गौतम साळवे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. 

राज्य शासनाकडून सुमारे 16 कोटी 50 लाख रूपये प्रकल्प खर्च असलेल्या प्रस्तावित दुपदरी भुयारी मार्गासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत दोन टप्प्यात सात कोटींचा निधी दौंड नगरपालिकेस देण्यात आला होता. त्यापैकी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे एकूण 5 कोटी 51 लाख 68 हजार 19 रूपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित 1 कोटी 48 लाख 39 हजार 981 रूपये खात्यावर शिल्लक ठेवणे आवश्यक असताना तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे, प्रभारी लेखापाल ज्ञानदेव गिरमे, लेखा लिपिक काशिनाथ काळाणे यांनी बेकायदेशीरपणे इतर 42 कामांसाठी सदर निधी वापरला. या बाबत 26 मे 2017 रोजी गौतम साळवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केल्यानंतर 29 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी यांनी या बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान गौतम साळवे यांनी स्मरणपत्र देत व पाठपुरावा केल्यानंतर 7 आॅगस्ट 2018 रोजी विद्यमान मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी शिवाजी कापरे, ज्ञानदेव कापरे व काशिनाथ काळाणे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमानुसार दोषारोप पत्र तयार करून विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. जिल्हाधिकारी सदर प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात याविषयी औत्सुक्य असून त्यांच्या निर्णय येईपर्यंत भुयारी मार्गाचे काम रखडणार असल्याचे स्पष्ट आहे.

साडेचार वर्षानंतरही भुयारी मार्गाचे भवितव्य अधांतरी...
भुयारी मार्गाचे भूमीपूजन होऊन साडेचार वर्षे झाली तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे सदर मार्गासाठी तिसर्या टप्प्यात मंजूर झालेले 8 कोटी 44 लाख रूपये नगरपालिकेच्या खात्यात वर्ग झाले आहेत. परंतु रेल्वे प्रशासन एकूण निधी जमा झाल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याने अन्य कामांसाठी वारपण्यात आलेले 1 कोटी 48 लाख रूपये कोण भरणार ?, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

Web Title: demand to inquiry for using underground road s fund for other work in daund pune