esakal | पुण्यात दरवळला कर्नाटकातील फुलांचा सुगंध
sakal

बोलून बातमी शोधा

demand for Karnataka flowers increases at Pune in Ganeshotsav  2020

पुण्यात दर वर्षीपेक्षा फुलबाजाराचे यंदाचे चित्र वेगळे आहे. पुण्याच्या बाजारपेठेत सकाळी झेंडूच्या फुलांचा दर प्रतीकिलो 200 ते 250 रुपये होता. पण, अचानक कर्नाटकातून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दीडशे रुपयांनी दर कोसळून तो प्रतीकिली शंभर ते दीडशे रुपये झाला.

पुण्यात दरवळला कर्नाटकातील फुलांचा सुगंध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कर्नाटकातील फुलांचा सुगंध पुण्यातील गणेशोत्सवात दर्वळला. दरवर्षी पुण्यात बाजारपेठ स्थानिक फुलांनी फुललेली असते. यंदा कोरोना उद्रेकामुळे फुल बाजाराचे चित्र बदलले असल्याचे निरीक्षण फुलाच्या व्यापाऱयांनी नोंदविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात दर वर्षीपेक्षा फुलबाजाराचे यंदाचे चित्र वेगळे आहे. पुण्याच्या बाजारपेठेत सकाळी झेंडूच्या फुलांचा दर प्रतीकिलो 200 ते 250 रुपये होता. पण, अचानक कर्नाटकातून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दीडशे रुपयांनी दर कोसळून तो प्रतीकिली शंभर ते दीडशे रुपये झाला.

दर वर्ष असे नसते. कारण, प्रत्येक वर्षी स्थानिक फुले बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. या वर्षी कोरोना उद्रेक आणि त्यामुळे लॉकडाऊन झाल्याने स्थानिक शेतकऱयांनी फुलांचे उत्पादन घेतले नाही. त्यामुळे कर्नाटकातून फुलांची आवक वाढली आहे. कर्नाटकातून आवक होणारा झेंडू, तगर, कन्हेरी, गुलाबाजी छोटी फुले पुण्याच्या बाजारपेठेत आली आहेत.  

Video : पुण्यातील मानाचे गणपतीही आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर; भक्तांना मिळाणार लाईव्ह दर्शन

गुलछडीचा दर प्रतीकिलो 400 ते 600 रुपये होता. जुई 1100 रुपये प्रतीकिलो होता. जुईच्या फुलांना उच्चांकी दर हा दिवाळीत असतो. पण, त्या वेळी आवक अगदीच कमी असते. त्यामुळे दरात वाढ होते. तेव्हा 1700 ते 1800 रुपये दर असतो. पण, सध्या बाजारात दोन ते तीनशे किलो जुईची आवक असूनही 1100 रुपये प्रतीकिलोपर्यंत दर वाढला असल्याचे निरीक्षण फुलांचे घाऊक व्यापारी सुरज गिरमे नोंदविले. 

तगर आणि कन्हेरी ही फुले कर्नाटकातून येतात. कन्हेरी प्रतीकिलो चारशे रुपये दर मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कर्नाटकातील फुलांच्या सुंगध दरवळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

loading image