लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी : दत्ता पडसलगीकर

daund
daund

दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली. 

दौंड येथे आज (ता. २२) राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच व सात मधील विविध विकासकामांचे उद्घाटन दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते झाले व त्या प्रसंगी ते बोलत होते. आदिती पडसलगीकर, अपर महासंचालक अर्चना त्यागी, अधीक्षक अशोक मोराळे, आमदार राहुल कुल, समादेशक श्रीकांत पाठक, तानाजी चिखले, प्राचार्या मनिषा दुबुले, प्राचार्य नीलेश अष्टेकर, आदी या वेळी उपस्थित होते. 

दत्ता पडसलगीकर म्हणाले, ``राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) सर्वात जास्त ताण असतो तरी देखील या दलाचा लौकिक कायम आहे. उत्कृष्ट कार्यासाठी केंद्र सरकारने या दलाचा आणि दलातील कार्यपध्दतींचा गौरव केलेला आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या गरजांकडे लक्ष देणे हे आमचे मूलभूत कर्तव्य असून त्यादृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. पोलिसांच्या मुलांची आणि कुटुंबीयांची काळजी घेतली तर पोलिस बांधव चांगले काम करू शकतात, याची जाणीव असल्याने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते या वेळी विविध शासकीय निधींमधून उभारण्यात आलेले ट्रॅफिक एज्यूकेशन पार्क, नूतनीकृत पोलिस वसाहत व खुले चित्रपटगृह, संरक्षक भिंत, पेट्रोल पंप, बालवाडी, मंगल कार्यालय, आदी कल्याणकारी उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सीताराम नरके यांनी आभारप्रदर्शन केले. 

नक्षलवादाच्या बिमोडासाठी अत्याधुनिक शस्त्रे....
गडचिरोली येथे नक्षलवाद विरोधात लढा देणार्या एसआरपीएफ जवानांशी संवाद साधताना जवानांनी चक्राकार पध्दतीने ड्यूटी लावणे आणि अत्याधुनिक शस्त्रांची मागणी केली आहे. अर्चना त्यागी यांनी त्या बाबत विशेष पुढाकार घेतला असून त्यासंबंधी थोड्याच काळात बदल जाणवेल, असा विश्वास दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com