पुणे : झेडपीमध्ये महाविकास आघाडी करा; काँग्रेस, सेनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची उद्या (ता. ११) निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या बंगल्यावर सर्व इच्छुकांशी संवाद साधला.

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पुणे जिल्हा परिषदेतही पदाधिकारी निवडीसाठी महाविकास आघाडी करावी, अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवारी (ता.१०) केली. याबाबतची माहिती अजित पवार यांनीच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एक पद देण्याची मागणी केल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

पाच लाखांच्या मुद्देमालासह त्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची उद्या (ता. ११) निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या बंगल्यावर सर्व इच्छुकांशी संवाद साधला. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, झेडपी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for a mahavikasaaghadi lead in ZP