पाच लाखांच्या मुद्देमालासह त्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पोलिसांनी त्याच्याकडील 95 ग्रॅम किंमतीचे सोन्याचे दागिने आणि तीन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. 

हडपसर : घरफोडी, वाहन आणि बसमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 2 घरफोडीचे, दोन बस मधील चोरीचे आणि एक मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्याकडील 95 ग्रॅम किंमतीचे सोन्याचे दागिने आणि तीन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पांढरे मळा येथील कालव्या लगत असलेल्या रस्त्यावर चॅाकलेटी रंगाच्या दुचाकीजवळ एक व्यक्ती थांबला असून तो सोन्याचे दागिने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवून ते विकण्याचा प्रयत्न करत होता.

- Video : पुण्यात पुन्हा कोसळले होर्डिंग...अन् काळजाचा चुकला ठोका

याबाबतची माहिती पोलिस कर्मचारी नितीन मुंढे, विनोद शिवले, शाहिद शेख, अकबर शेख यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय 20, रा. मांजरी बुद्रूक, ता. हवेली, जि. पुणे ) यास ताब्यात घेतले.

- एक्स्प्रेस हायवेवरच्या कोंडीला मिळणार फुलस्टॉप; 'या' ठिकाणी होतोय नवा बोगदा!

त्याच्या हातामध्ये एक सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक सोन्याचे गंठण, एक सोन्याचे नेकलेस, एक सोनसाखळी, एक सोन्याचा मणी गंठण आणि दोन कानातील सोन्याच्या रिंगा असे एकूण 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि नंबरप्लेट नसलेली एक मोटार सायकल असे एकूण 5 लाख दहा हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासावेळी जप्त करण्यात आला आहे.

- संक्रांत जवळ येतेय; चायनीज-नायलॉनच्या मांजाविरुद्ध करा कारवाई!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadapsar Police have arrested the accused in a burglary and vehicle theft