खवा खा, पण दूधाला भाव द्या; कोणी केली मागणी?

गजेंद्र बडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध दरवाढ, दूध भुकटी आणि दुधासाठी थेट अनुदान सरकारने दिले पाहिजे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे, अशी मागणी मुळीक यांनी यावेळी केली.​

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱयांना गाईच्या दूधाला प्रतिलिटर ३० रुपये दर देण्यात यावा. दूध भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये तर दूधाला प्रतिलिटर १० रूपयांचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी भाजपप्रणीत महायुतीच्यावतीने शनिवारी शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी पुणे शहर भाजपच्यावतीने मांजरी (ता. हवेली) येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूधाचा खवा बनवून सरकारचा निषेध करण्यात आला. 'तुम्ही दूधाचा खवा बनवून खा. पण दूधाला भाव द्या, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायगाव (ता. मावळ) येथे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी डोणजे (या.हवेली) येथे दूध एल्गार आंदोलन करण्यात आले.  

सायकल, कार नव्हे तर, आता जनावरांची खरेदी-विक्रीही ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध दरवाढ, दूध भुकटी आणि दुधासाठी थेट अनुदान सरकारने दिले पाहिजे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी मुळीक यांनी यावेळी केली. 

यावेळी पुणे शहर भाजपच्यावतीने  शेतकऱ्यांकडून २५ रुपये लिटर  दराने दूध खरेदी करण्यात आली. या दूधावर आंदोलनस्थळीच प्रक्रिया करून खवा तयार करण्यात आला. हा खवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. याशिवाय नसरापूर, पर्वती बावधान, उरूळी -मंतरवाडी फाटा, वाघोली, कात्रज येथेही हे आंदोलन करण्यात आले.

दुचाकीस्वाराने तरुणीवर केला धारदार शस्त्राने वार, अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand for mahayuti to give price to milk