राडारोडा काढेपर्यंत मेट्रोचे काम थांबवण्याची मागणी 

राडारोडा काढेपर्यंत मेट्रोचे काम थांबवण्याची मागणी 

पुणे- वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठी नदीपात्रात केवळ खांब (पिलर) उभारण्यास राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) परवानगी दिली आहे. मात्र, खांबांसह अन्य स्वरूपाचे बांधकाम आणि राडारोडा टाकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील राडारोडा काढा आणि तोपर्यंत मेट्रोचे काम थांबवावे, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी केली. 

दरम्यान, मेट्रोच्या कामाबाबत महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसारच मेट्रोचे काम करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

नदीपात्रातील मेट्रोचे काम, त्यातील त्रुटी आणि परिणाम याबाबत "ग्रीन पुणे'च्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर, सुजीत पटर्वधन, आनिता बेंनिझर-गोखले उपस्थित होते. 

नदीपात्रात मेट्रोचे काम करताना दहा-बारा फूट उंचीचा भराव टाकला आहे; तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे. त्यामुळे काही भागात नदीच्या प्रवाहासाठी जेमतेम 2 फूटही जागा राहिलेली नाही. पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. जादा बांधकाम करू नये आणि राडारोडा तातडीने उचलण्यात यावा, अशी अपेक्षा यादवाडकर, पटवर्धन यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com