
पिंपरी : पीएमआरडीएमध्ये समाविष्ट पंतप्रधान आवास योजनेत पात्र ठरण्यासाठी सर्वेक्षणादरम्यात लाभार्थ्यांना पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याकरिता दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Video : धरणात पाणी असूनही गुरुवारी पुरवठा बंद का? : चंद्रकांत पाटील
या योजनेत आर्थिक दुर्बल व अल्पोत्पन्न घटकांतर्गत 31,459 व 21,474 घरांना सरकारची मान्यता मिळाली आहे. सध्या दौंड, भोर, हवेलीतील घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. या तालुक्यांतील उरुळी कांचन, दापोडी, माण, म्हाळुंगे, केडगाव, बोपोडी, गलांडवाडी, देगाव, सावरदरे या गावांमध्ये सर्वेक्षणादरम्यान गावकऱ्यांना पैशांची मागणी करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील देगावमधील दोन गावांत पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्तापर्यंत चार ते पाच नागरिकांनी पैसे मागितल्याचा खुलासा केला आहे. याबाबत पीएमआरडीएकडे वेळोवेळी तक्रारही केली आहे. सुरुवातीला योजनेबाबत प्रक्रिया सुरळीत होत असल्याचे सांगितले. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीतच असे प्रकार घडत असल्याचे भोर येथील एका तक्रारदाराने सांगितले. सर्वेक्षण करण्याचे काम दिलेल्या एजन्सीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत.
Video : CAA, NRC विरोधात पुण्यात महारॅली; हजारो नागरिकांची उपस्थिती
योजनेत घर बसत नसल्यास कागदपत्रांची काळजी करू नका. सर्वेक्षणासाठी दोनशे रुपये फॉर्म फी भरावी लागेल. त्यानंतर मार्किंग प्लॅन व बांधकाम परवानगीसाठी दोन ते अडीच हजार रुपये भरावे लागतील. प्रत्यक्षात बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर तीस हजार रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याचे सांगितले.
लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर
सध्या सर्वेक्षणाची जागा पाहणी केली जात आहे. तीनशे चौरस फूट जागा, ऍमेनिटी, रस्ता व घर घेणाऱ्याचा सातबारा उतारा तपासला जात आहे. यासाठी पीएमआरडीए एजन्सीला सात हजार चारशे रुपये देत आहे. यामध्ये जुन्या घरांच्याही योजनेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन घरांचे आमिष दाखविले जात आहे. अर्ज भरण्याची माहिती पीएमआरडीएच्या पीएमएवाय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांना याची पुरेशी माहिती नाही.
थर्टी फर्स्टमुळे पुणे-सातारा रस्त्यावर कोंडी; टोलनाक्यावर रांगाच रांगा
सर्वेक्षण सुरू असलेली गावे
आर्थिक दुर्बल अल्पोत्पन्न
भावडी, वाघोली 180 60
हिंजवडी, मुलखेड 703 -
वाघोली 425 -
लोणीकंद 1261 271
म्हाळुंगे, खेड 7820 2793
माण, म्हाळुंगे 4116 2387
इंगळे, खेड 648 -
#SundayMotivation : अन् रिक्षाचालक महिलांची उलगडली कहाणी
याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल. असे प्रकार घडत असल्यास नागरिकांनी पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडे तक्रार करावी. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. घरांसाठी अधिक माहिती हवी असल्यास थेट पीएमआरडीए कार्यालयात संपर्क करावा.
- प्रवीण देवरे, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.