लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

जिथे भेळ तिथे खेळ असा मोहिते पाटलांचा प्रकार असल्याचं चाकणकर म्हणाल्या होत्या. आता चाकणकरांना दिलेलं आमंत्रण त्या स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुणे : दोन दिवसांपुर्वी वसंतदादा शुगर इनस्टिट्यूट्  (व्हीएसआय़मध्ये) झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचेच सांगितले होते. यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना लक्ष्य केले होते. यावरून मोहिते समर्थकांनी चाकणकर यांच्यावर सोशल मिडीयातून टीकेची झाेड उठविली होती. यालाच आता मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी उत्तर देत मोहते समर्थकांना थेट आव्हान दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी विजयसिंह मोहिते पाटलांवर केली होती. त्यांच्या याच टीकेवर मोहिते समर्थकांनी चाकणकरांना लावणी महोत्सव आणि भेळीचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांना अटीसह आमंत्रण स्विकारण्याची विनंती केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमची मैत्रीण रूपाली ताई चाकणकर तुम्ही आमंत्रण स्वीकारलं पाहिजे, पण अट एकच ठेवा ज्यांनी आमंत्रण दिलंय त्यांची आई, बहीण, बायको सोबत हवीच म्हणजे कसं लावणीला रंगत येईल, भेळी सकट, असा खोचक टोला रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावला आहे. आमंत्रण स्वीकाराच, स्त्री शक्ती सुद्धा कमी नाही हो. आम्ही पण येऊ ‘मनसे’ लावणी पाहायला, असंही उपोरोधिकपणे म्हणाल्या आहेत.

आणखी वाचा - मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची यादी फुटली?

दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटलांनी फेसबूक पोस्टकरत मोहिते पाटील समर्थकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दरम्यान, जिथे भेळ तिथे खेळ असा मोहिते पाटलांचा प्रकार असल्याचं चाकणकर म्हणाल्या होत्या. आता चाकणकरांना दिलेलं आमंत्रण त्या स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा - केंद्रीय मंत्री म्हणतात, 'भारतमाता की जय म्हणणारेच देशात राहतील'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali thomabre patil criticize to mohite patil suportters