esakal | स्पर्धा परीक्षा क्लासेसला परवानगी देण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Competition-Exam

महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली अनामत रक्‍कम किंवा सुरक्षा ठेव परत करण्याकडे महाविद्यालयांच्या तक्रारी येत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही रक्‍कम परत करा, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.

स्पर्धा परीक्षा क्लासेसला परवानगी देण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यसेवा परीक्षा तोंडावर आलेली असताना शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी बंद असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या क्लास चालकांनी क्लासेसला ५० टक्के उपस्थितीमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा १४ मार्चपर्यंत बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे क्लास चालकांचे धाबे दणाणले आहे. पुण्यात एमपीएससी, यूपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या क्लासचालकांनी एकत्र येऊन सोमवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालयात यासंदर्भात निवेदन दिले आहे.

आरोग्य विभागाची भरती रद्द करा, सरळसेवेचा कारभार MPSCकडे द्या; मुख्यमंत्र्यांना साकडं

आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी क्लासेस लावले होते. पण क्लास बंद केल्याने विद्यार्थी, क्लासचालक यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 

30 टक्के हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नागनाथ गव्हाणे म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे सज्ञान आहेत. त्यांच्याकडून नियमांचे पालन योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे ५० टक्के उपस्थितीमध्ये क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. 

Edited By - Prashant Patil

loading image