esakal | आरोग्य विभागाची भरती रद्द करा, सरळसेवेचा कारभार MPSCकडे द्या; मुख्यमंत्र्यांना साकडं

बोलून बातमी शोधा

Uddhav_Thackeray}

सरळसेवेची भरती खासगी कंपन्यांमार्फत न करता ‘एमपीएससी’कडून करावी अशी मागणी राज्यात यापूर्वीपासून केली जात आहे.

आरोग्य विभागाची भरती रद्द करा, सरळसेवेचा कारभार MPSCकडे द्या; मुख्यमंत्र्यांना साकडं
sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, अर्धा ते दीड तास पेपर उशिरा मिळणे यासह अन्य कारणांनी गोंधळ झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा घ्या, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

आरोग्य विभागात रिक्त असलेली गट क च्या पदांची सरळसेवा भरतीसाठी दोन वर्षापूर्वी अर्ज भरून घेण्यात आले होते. रविवारी (ता.२८) एकाच दिवशी सकाळच्या सत्रात १४ संवर्गाची, तर दुपारच्या सत्रात ४० संवर्गाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १ लाख ३३ हजार उमेदवारांनी हजेरी लावली.
आरोग्य विभागाने ही भरती खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेतली.

Video: नाद करायचा नाय, ब्लॅकबेल्ट राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल!

औरंगाबाद, नागपूर येथे परीक्षेपूर्वीच पेपर फुटेल, इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करून परीक्षेत उत्तरे लिहिण्यात आली. आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षा असतानाही बाहेरचे प्रश्‍न विचारले गेले. बैठक व्यवस्था चुकीची केल्याने मास कॉपीचे प्रकार घडले आहेत. विद्यार्थ्यांनी सुमारे दीड तास उशिरा पेपर मिळाला, असुविधेबद्दल विचारणा करणाऱ्या उमेदवारांना मारहाण करण्यात आली, तसेच मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्धी प्रश्‍नपत्रिका इंग्रजीतून देण्यात आली. बैठक व्यवस्थेतील गोंधळ, अपारदर्शक कारभार संतप्त उमेदवारांना रोखण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची नामुष्की ओढवली.

VIDEO : पहा भगतसिंह, टिळक आणि विवेकानंदांचे हुबेहुब हावभाव; AI टेक्निकची अद्भूत कमाल​

सरळसेवेची भरती खासगी कंपन्यांमार्फत न करता ‘एमपीएससी’कडून करावी अशी मागणी राज्यात यापूर्वीपासून केली जात आहे. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी चार कंपन्या निश्‍चित केल्या, पण त्यातील काही कंपन्यांना यापूर्वी बॅकलिस्ट केलेले असताना पुन्हा त्याच कंपन्यांची निवड झाली, त्यामुळे टीका झाली होती, पण या कंपन्या कायम ठेवत पहिली परीक्षा रविवारी राज्यात झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला. त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया रद्द करून एमपीएससीकडूनच भरती करा, अशी मागणी केली जात आहे.

पुण्यात मृत्यूदर रोखण्यात डॉक्टरांना यश; जाणून घ्या काय आहे तज्ज्ञाचे मत?

एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, महेश घरबुडे, पद्माकर होळंबे, निलेश गायकवाड यांनी याबाबत मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहिले आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करून एमपीएससीमार्फतच भरती करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही परीक्षा रद्द करून फक्त एमपीएससीकडून भरती करा अशी मागणी करत ओनली एमपीएससी हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड करण्यात आला. याबाबत महाआयटी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)