नगरसेवक बाबूराव चांदेरे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

बाणेर-बालेवाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. याप्रकरणी चांदेरे यांचे पुत्र समीर चांदेरे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेची चतुःश्रृंगी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत या प्रकरणात सुपारी घेणारा कारागृहातील गुंड अनिल यशवंते याची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. 

पुणे : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका गुंडाला नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांदेरे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. 

बाणेर-बालेवाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. याप्रकरणी चांदेरे यांचे पुत्र समीर चांदेरे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेची चतुःश्रृंगी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत या प्रकरणात सुपारी घेणारा कारागृहातील गुंड अनिल यशवंते याची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर चांदेरे यांच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात घेऊन, त्यांना पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीचे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना देण्यात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे पत्र देण्यात आले आहे. पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, विशाल विधाते, अर्जुन ननावरे, जंगल रणवरे, चेतन बालवडकर, अर्जुन शिंदे, मनोज बालवडकर, महादेव चाकणकर, प्रणव कळमकर, प्राजक्ता ताम्हाणे,सुषमा ताम्हाणे, अमोल भोरे, अवधूत लोखंडे, ओंकार रणपिसे यांच्या शिष्टमंडळाने हे पत्र दिले.
जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for police protection for corporator Baburao Chandere