
रामवाडी (पुणे) : चंदननगर येथील टाटा गार्डरूम जवळ पुणे महापालिकेकडून बसवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर झाकण नाही. मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक नाही. तसेच मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असल्याने आतमध्ये मोकाट जनावरांचा वावर अधिक वाढला आहे. टाकीच्या दिशेने वर जाण्यासाठी जो जिना आहे त्या ठिकाणी सुरक्षितेसाठी गेट नसल्याने कुणीही व्यक्ती तसेच प्राणी सहजपणे ये- जा करत असल्याने पिण्याच्या पाण्याची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकासह लोकप्रतिनिधीं कडून देण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन कडून गांभीर्याने घेतले जात नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं हीच अपेक्षा नागरिकांकडून केली जात असते. पण चंदननगर येथील टाटा गार्डरूम येथील पाण्याची टाकीच्या येथील मुख्य प्रवेश द्वार तुटल्याने दोरी बांधण्यात आली आहे. आतमध्ये मोकाट जनावरांचा वावर अधिक वाढला आहे. टाकीकडे जाण्यासाठी जो जिना आहे तिथे सुरक्षितेसाठी प्रवेशद्वार नसल्याने कोणीही व्यक्ती तसेच प्राणी आतमध्ये जाऊ शकतात. महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा स्वच्छ होत असला तरी ज्या टाक्यांमध्ये पाणी जमा होते त्या कित्येक वर्षापासून साफसफाई करण्यात आल्या नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टाकीवर झाकण नसल्याने धुळीबरोबर येणारा कचरा पाण्यात पडत आहे. टाकीतून काही ठिकाणी दिवसरात्र थेंब थेंब पाण्याची गळती होत असल्याने वर्षभरात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाकीची सुरक्षितता आणि स्वच्छता गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीनं कामे पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे.
मुख्य गेटवर सुरक्षा रक्षक नाही. पिण्याची जी टाकी आहे त्यावर झाकण नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच वर्षापूर्वी या टाक्या साफ केल्या होत्या. त्यानंतर साफ केल्या नाही . तिन्ही प्रभागातील नागरिकांना याच टाकीतून पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेकडून वर्षातून एकदा तरी टाकीची साफसफाई केली पाहिजे.
-भैयासाहेब जाधव, नगरसेवक
मुख्य प्रवेशद्वार दुरुस्त केला जाईल. त्याच बरोबर टाकीकडे जाण्यासाठी जो जिना आहे तिथे ही गेट बसवून लॉक लावण्यात येईल. टाकीच्या ठिकाणी जी पाणी गळती होत आहे त्या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ कामे पूर्ण केली जातील.
एकनाथ गाडेकर, उपअभियंता, बंडगार्डन पाणी पुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.