पोलिसांतील प्रकरण मिटविण्यासाठी 50 लाखांच्या खंडणीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

पोलिस ठाण्यात दाखल प्रकरण मिटविण्यासाठी दोन दिवसात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे ः पोलिस ठाण्यात दाखल प्रकरण मिटविण्यासाठी दोन दिवसात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मीरा अवधूत चव्हाण व सचिन जाधव (दोघेही रा. संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैजयंती भुताळे (वय 47 , रा. दळवीनगर, नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुताळे या त्यांच्या कुटुंबीयांसह नऱ्हे परिसरात राहतात. त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी आरोपी मीरा यांनी सचिनला वैजयंता यांच्या घरी पाठविले. त्याने फिर्यादी यांच्याकडे संबंधीत प्रकरण मिटविण्यासाठी 50 लाखाची मागणी केली.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

पैसे न दिल्यास फिर्यादीच्या मुलांनाही अडकविण्याचे धमकी देत पैशांची मागणी केली. या घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for Rs 50 lakh ransom for disposal of case filed at police station