नीरा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे तातडीने बसविण्याची मागणी

nira
nira

वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या. 

चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती, दौंड व सोलापूर जिल्हातील माळशिरस व इतर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिली आहे. सध्या पावसाळ्यातही या तालुक्यामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पुणे जिल्हातील धरणे शंभर टक्के भरल्याने नीरा नदीमध्ये धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते.

सध्या धरणक्षेत्रामध्ये पावसाचा जोर वसरला असून नदीच्या पाण्याची पातळी ही कमी होत आहे. नीरा नदीतील पाणी वाहून जावू लागले आहे. गेल्यावर्षी प्रशासनाकडून ढापे टाकण्यास उशीर झाल्यामुळे बंधाऱ्यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी पाणी  अडविण्यात आले होते. याचा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. हजारो एकर पिके जळून खाक झाली होती.

नीरा नदीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी नीरा नदीमध्ये आठ दिवस उपोषण केले होते. ही वेळ चालू वर्षी येवू नये म्हणून इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज शुक्रवार (ता.३१) खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेवून नीरा नदीवरती जांब, कुरवली, चिखली, भोरकरवाडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, सराटी, बांगार्डे, तिरवंडी, आनंदनगर, सराटी, लुमेवाडी, टणू व नीरा-  नरसिंगपूर येथील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे टाकण्यास सुरवात करण्याची मागणी निमसाखरचे माजी सरपंच नंदकुमार रणवरे, दत्ता घोगरे,किरण बोरा, पप्पू पाटील, हनुमंत शिंदे, धनंजय रणवरे, पप्पू फडतरे,गौतम गायकवाड, दत्तात्रेय सवासे, सुखदेव निकम यांनी केली आहे.  पाटबंधारे विभागाचे  शाखाधिकारी लक्ष्मण सुद्रिक यांनी प्रशासनाची परवानगी घेवून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 

 बंधाऱ्याची गळती कायमस्वरुपी रोखण्याची मागणी... 
नीरा नदी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या नदीवरती दोन्ही तालुक्यात सुमारे १८ कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र कुजलेले ढापे, बंधाऱ्याची दुरावस्था, वाळूमाफियाकडून बंधारे फोडण्याचे घडणारे प्रकार, प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे प्रत्येकवर्षी बंधाऱ्यातुन पाण्याची गळती होत असल्याने ऐन उन्हाळात शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने पाणी गळती कायमस्वरुपी राेखण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यामधून होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com