esakal | हॉटेलवरच व्यवसायबंदीचा अन्याय का?; बारामतीतील हॉटेलचालकांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

hotel.jpg

 कोरोनामुळे सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवसांपासून पार्सल सुविधेवर सुरु असणारी हॉटेल्स आता नाईलाजाने बंद करावी लागतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गर्दी होणा-या बँकापासून मंडईपर्यंत आणि मोठ्या दुकानांपासून मॉलपर्यंत सगळ्यांनाच परवानगी दिलेली असताना हॉटेलवरच व्यवसायबंदीचा अन्याय का ....असा हॉटेलचालकांचा सवाल आहे. 

हॉटेलवरच व्यवसायबंदीचा अन्याय का?; बारामतीतील हॉटेलचालकांचा सवाल

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनामुळे सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवसांपासून पार्सल सुविधेवर सुरु असणारी हॉटेल्स आता नाईलाजाने बंद करावी लागतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गर्दी होणा-या बँकापासून मंडईपर्यंत आणि मोठ्या दुकानांपासून मॉलपर्यंत सगळ्यांनाच परवानगी दिलेली असताना हॉटेलवरच व्यवसायबंदीचा अन्याय का ....असा हॉटेलचालकांचा सवाल आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकट्या बारामती शहरात 40 छोटी मोठी हॉटेल्स, 24 स्वीट होम्स आहेत. या सर्व व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कर्मचा-यांचीही संख्या लक्षणीय आहे. सध्या पार्सल सुविधेस प्रशासनाने परवानगी दिलेली असली तरी ग्राहक हॉटेलमध्ये येऊन जेवण केल्यानंतर जो व्यवसाय होतो तसा व्यवसाय होत नसल्याने हॉटेलमालक चालक आर्थिक संकटात आहेत. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल्स बंद आहेत, त्या मुळे कर्मचा-यांचे पगार करण्यासह वीजेचे बिल, घरपट्टी, जागाभाडे, जीएसटी, इनकम टॅक्स, सेल्स टँक्स, लक्झरी टॅक्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बँकेचे कर्ज व त्या वरील व्याज हे कोठून भागवायचे असा प्रश्न अनेकांपुढे आहे. अनेक जणांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन आपले व्यवसाय सुरु केलेले आहेत, त्यांच्या पुढे तर अडचणींचे डोंगर  उभे आहेत. 

शासनाने आता हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही हॉटेलचालक संपूर्णपणे अडचणीत येणार आहोत. अनेकांची अवस्था बिकट आहे, त्या मुळे तातडीने आम्हाला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दयावी

- प्रवीण आहुजा, हॉटेलचालक.

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

इतर सर्व बाबी खुल्या करताना तेथेही गर्दी होणारच आहे, बँकांसह इतर अनेक दुकानातूनही गर्दी होतेच, मग हॉटेलचालकांवरच अन्याय का केला जात आहे. हॉटेल चालक सर्व काळजी घेत असतानाही सुरु करण्याची परवानगी दिली जात नाही हे दुर्देवी आहे.

– संदीप गुजर, हॉटेल चालक

 

गेल्या अनेक दिवसांपासून सलगपणे हॉटेल बंद असल्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर झालेला आहे. आर्थिक घडी विस्कटू लागल्याने अडचण निर्माण होते आहे. शासनाने आता हॉटेल व्यावसायिकांना अनुदान देण्याची गरज आहे विविध करसवलतींचीही गरज आहे.

गिरीश कुलकर्णी, हॉटेल चालक.