मंडप व्यावसायिकांनी घातले थेट मंत्री महोदयांनाच साकडे

राजकुमार थोरात
Friday, 2 October 2020

कोरोनाच्या महामारीचा मंडप व्यावसायिकांवर गंभीर परीणाम झाला असून मंडप व्यवसाय सुरु करण्यासाठी  इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना साकडे घातले असून व्यवसाय सुरु करण्याची मागणी केली आहे.

वालचंदनगर (पुणे) : कोरोनाच्या महामारीचा मंडप व्यावसायिकांवर गंभीर परीणाम झाला असून मंडप व्यवसाय सुरु करण्यासाठी  इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना साकडे घातले असून व्यवसाय सुरु करण्याची मागणी केली आहे.
मार्च महिन्यापासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

न्यायालयाने नोटीस बजावली अन् रखडलेल्या घटस्फोटाचा मार्ग झाला मोकळा​

कोरोनाच्या महामारीमुळे  उन्हाळ्यामधील लगीनसराई , विविध महापुरुषांच्या जयंती, गणेशउत्सव व इतर सार्वजनिक उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका मंडप व डेकोरेशन व्यावसायला बसला असून इंदापूर तालुक्यासह राज्यातील मंडप व्यवसायिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावला असून उपासमारीची वेळ आली आहे. तसेच नवरात्र उत्सव ही साधेपणाने साजरा करण्याची सूचना राज्यशासनाने दिली आहे.

शरद पवार म्हणाले, 'होय, मी आज सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली!'​

इतर व्यवयासाप्रमाणे नियम व अटी घालून मंडप व डेकोरेशन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी मंडप मालक संघटनेने  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भरणे यांनी सांगितले की,  मंडप व्यावसायाबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये व्यावसाय सुरु करण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र कासार, नाना बोराटे, विजय राऊत,  रत्नकांत ढवळसकर, रोहित जगताप, दादा पठाण, अनिल निंबाळकर, मंगेश माने, बंडू मुलाणी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचं नाही तर पालकांचंच वाढलं टेन्शन; एचएसव्हीसी शाखा बंद होण्याच्या मार्गावर!​

 आंदोलन करण्याचा इशारा...
येणाऱ्या काळामध्ये सरकारने मंडप व्यवसायाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा  इशारा इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start a pavilion business