पाणी गळती बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

राजकुमार थोरात
बुधवार, 9 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : जंक्शन (ता. इंदापूर) जवळील नीरा डाव्या कालव्याच्या 46 क्रमांकाच्या वितरिकेजवळील कालव्याच्या मुख्य दाऱ्यामधून होणारी पाण्याची गळती बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नीरा डाव्या कालव्यातुन शेतीच्या पाण्याचे आवर्तन सुरु आहे. कालव्याच्या 46 क्रमांकाच्या वितरिकेच्या खालील बाजूचे पाण्याचे आवर्तन संपले  अाहे. सध्या 46 क्रमांक व त्याच्या वरील वितरिकेमधून पाण्याचे आवर्तन सुरु झाले आहे. 46 क्रमांकाच्या वितरिकेलगत नीरा डाव्या कालव्याचे मुख्या दारे बंद करुन कालव्यातुन खाली जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

मात्र मुख्य  दाऱ्याला पाणी गळती असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.तसेच दाऱ्याचे शेजारचे बांधकाम दगडी असून त्यामधून पाणी गळती होत आहे. पाणी गळतीमुळे कालव्यातील पाण्याचा वेग कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती पाणी मिळण्यास विलंब होत आहे.तसेच गळती झालेले पाणी वाया जात असल्याने पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी गळती बंद करण्याची मागणी शेतकऱ्यमधून करण्यात येत आहे.

Web Title: demand for stop leakage