पिंपळे सौदागरमध्ये तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याची मागणी

मिलिंद संधान 
बुधवार, 20 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - पिंपळे सौदागरमधील महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याची मागणी येथील स्थानिकांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केली आहे. 

सौदागरमधून पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध उपनगरात तसेच हिंजवडी येथील आय.टी. कंपन्यांमध्ये जाणाऱ्या महिला वर्गाचे प्रमाण मोठे आहे. त्यातच पीएमपीएमएल प्रशासनाची फक्त महिला वर्गासाठी कार्यान्वित असलेली तेजस्विनी बस सेवा शहराच्या इतर उपनगरातून केली आहे. त्यामुळे लोखसंख्येने लाखाच्या घरात गेलेल्या पिंपळे सौदागरमधील चाकरमानी महिलांचे प्रमाण शहराच्या इतर भागापेक्षा तुलनेने प्रमाण जास्त आहे. 

याबाबत महिलांनी स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांचीही भेट त्यांची व्यथा मांडली. नगरसेवक काटे व कुटे यांनीही पीएमपीएमएल प्रशासनाशी संपर्क करून एका पत्राद्वारे सौदागर मधून तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Demand for Tejaswini bus service