baburao pachange and shri ranjangaon ganpati devasthan trust
sakal
शिरूर - रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती देवस्थानच्या परंपरेशी निगडीत असलेल्या करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा आणि ढोकसांगवी या गावांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष अॅड. बाबुराव कोंडीबा पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे.