School Bus, Van : स्कूलबस, व्हॅनचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढविण्याची मागणी

कोरोना काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने थांबून होती. त्यांचे नुकसान होऊन आयुर्मान वाढले आहे.
school van
school vane sakal

पुणे - कोरोना काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने थांबून होती. त्यांचे नुकसान होऊन आयुर्मान वाढले आहे. वाहतूकदारांचे नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल बस, व्हॅन यांना दोन वर्षांसह आणखी तीन वर्षे असे एकूण पाच वर्षांचे आयुर्मान वाढवून द्यावे, अशी मागणी विद्यार्थी वाहतूकदारांनी केली आहे.

परिवहन विभागाने ऑल इंडिया परमीट सहस्कूल बस परमिट असणाऱ्या वाहनांचे आयुर्मान निश्चित केले आहे. यात वाहनांना १५ वर्षांची मर्यादा घातली आहे. १५ वर्षांनंतर या परमीटअंतर्गत वाहनातून प्रवासी अथवा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळेसोबतचा करारपत्र व आरटीओचे परमिट आवश्यक आहे. परमिट हे पाच वर्षांसाठी दिले जाते. परिवहन विभागाने कोरोना काळातील दोन वर्षांचा विचार करून त्या दोन वर्षांसह आणखी तीन वर्षे, असे मिळून एकूण पाच वर्षे वाढवून द्यावीत, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे.

परिवहन विभागाने अन्य वाहनांप्रमाणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आयुर्मान १५ ऐवजी २० वर्ष इतके करावे. कोरोना काळात वाहतूकदारांचे नुकसान झाले आहे. आयुर्मान वाढविल्यास वाहतूकदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

- बापू भावे, रिक्षा फेडरेशन,खजिनदार, पुणे.

एकाच शाळेसमवेत करारपत्र नको

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा अथवा व्हॅनचालकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. वाहतुकीचे दर वाढविल्यास पालकांचा रोष पत्करावा लागतो. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करीत हा व्यवसाय करावा लागतो. त्यात एका शाळासमवेत करार झाल्यानंतर त्या चालकास दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे वाहतूकदारांची मोठी आर्थिक कोंडी होते. तेव्हा वाहतूकदारांना एकाच वेळी किमान तीन शाळेशी करार करून विद्यार्थी वाहतूक करण्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी वाहतूकदारांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com