esakal | नगरसेवकांकडून रुग्णवाहिका खरेदीचा आग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

नगरसेवकांकडून रुग्णवाहिका खरेदीचा आग्रह

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - नगरसेवकांकडून (Corporator) सहयादीतून त्याच-त्याच कामांवर पुन्हा लाखो रुपये खर्च होत असल्याची टीका (Comment) होत असते. आता मात्र, नगरसेवकांमध्ये रुग्णवाहिका खरेदीचा (Ambulance Purchasing) टूम निघाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या महिन्यात असे चार प्रस्ताव (Proposal) मंजूर करून रुग्णवाहिका खरेदीसाठी ८० लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानंतर आता आणखी ११ प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली नगरसेवकांकडून सुरू आहे. (Demand to Purchase Ambulance from Corporators)

अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक नगरसेवकास दोन ते पाच कोटी रुपयांचा सहयादीचा निधी आहे. त्यातून हे नगरसेवक डांबरीकरण, सांडपाणी वाहिनी टाकणे, दिवे लावणे, सीसीटीव्ही, बाकडे खरेदी करणे अशी कामे करतात. २५ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणाद्वारे रुग्णवाहिका खरेदीचे चार प्रस्ताव नगरसेवकांनी दिले. त्यास एका झटक्यात मान्यता देण्यात आली. हे प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आले आहेत.

हेही वाचा: EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडे ५८ रुग्णवाहिका आहेत. कोरोनाकाळात त्या अपुऱ्या पडल्याने सुमारे ७२ खासगी रुग्णवाहिका अधिग्रहण केल्या व रुग्णवाहिका मिळविण्यासाठी हेल्पलाइन सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका अपुऱ्या पडल्याने आता थेट नगरसेवकच त्या खरेदी करण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत आहेत. याबाबत महापालिकेचा व्हेईकल डेपो व आरोग्य विभाग मात्र अनभिज्ञ आहे.

आरोग्य विभागाला रुग्णवाहिकेची गरज असल्यास त्यांच्याकडून मागणी व निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यानंतर खरेदीची प्रक्रिया राबविली जाते. वर्गीकरणाद्वारे नगरसेवकांकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी निधी येत असला तरी आरोग्य विभागाचे पत्र असणे आवश्‍यक आहे, तसेच वित्तीय समितीची मान्यता त्यास आवश्‍यक आहे.

- महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त, महापालिका

आपल्याकडे पुरेशा रुग्णवाहिका आहेत, पण कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली होती. रुग्णवाहिकेसाठी वर्गीकरण करताना आरोग्य विभागाकडे चौकशी करण्यात आलेली नाही. आवश्यकता भासल्यास वाहन विभागाकडे मागणी केली जाईल.

- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका

loading image