Pune News : शेवाळेवाडी गावाला महापालिकेने बंद नळाने पाणी पुरवठा करण्याची मागणी

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले
Demand to supply water to Shewalewadi village municipal corporation closed tap water pune
Demand to supply water to Shewalewadi village municipal corporation closed tap water punesakal

मांजरी : गेल्या वर्षी महापालिकेत समाविष्ट झालेल्या शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

उपयुक्तता व उपाययोजना म्हणून भैरोबा पंपिंग स्टेशन मधील मैला मिश्रित पाणी परिसरातील शेतीसाठी सोडले जात आहे. त्यामुळे येथील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने १९६५ सालापासून गावाला महानगरपालिकेकडून बंद नळाने पाणी पुरवठा केला जात होता. वाढत्या नागरिकरणामुळे हा पाणीपुरवठा अपूरा होऊन योजना मोडून पडली. गावाने त्यानंतर वीहरी खोदून त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला.

काही वर्षांपूर्वी मुंढवा जॅकवेलचे पाणी जुन्या कालव्यातून सोडल्याने पुन्हा परिसरातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे दूषित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यात घोटाळा होत आहे. बऱ्याचदा अपुरा व दूषित पाणी पुरवठा होत आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे म्सणाले, "टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. शेवाळेवाडी गावाला पूर्वीसारखेच बंद नळाद्वारे पाणीपुरवठा करावा. त्यासाठी काही वाहिन्यांची दुरूस्ती तर काही वाहिन्या नवीन टाकाव्या लागणार आहे. त्यासाठी पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी इंद्रभान रणदिवे, अनिरुद्ध पावसकर, सुभाष पावरा यांना निवेदन देवून शेवाळेवाडी गावासाठी बंद नळाने पाणीपुरवठा करावा, अशी आमची मागणी आहे.'

- राहुल शेवाळे जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

"शेवाळेवाडी गावातील नागरिकांनी केलेल्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यासाठी त्या भागातील या विभागातील अभियंत्यांकडून अहवाल मागवून निर्णय घेण्यात येईल.'

- अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता, पाणी पुरवठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com