esakal | 'मुख्य सचिवांवर कारवाई करावी, कारण...'

बोलून बातमी शोधा

tushar zende

'मुख्य सचिवांवर कारवाई करावी, कारण...'

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : राज्याच्या मुख्य सचिवांकडून कोरोनाच्या काळात काढलेले सर्व आदेश इंग्रजीत असून मराठी माणसाला हे आदेश समजलेच नाहीत, मराठी भाषेत आदेश देणा-या मुख्य सचिवांविरुध्द कारवाईची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यात एक एप्रिलपासून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे अनेक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश मुख्य सचिवांच्या सहीने इंग्रजीतून जारी केलेले आहेत. ज्या आदेशांचे पालन जनतेने करायचे आहे त्यांच्यापर्यंत इंग्रजी भाषेतील हे आदेश पोहोचले का हा संशोधनाचा विषय असल्याचे झेंडे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा: पुणे : आॅक्सिजनअभावी भोर तालुक्यामधील महिलेचा मृत्यू

सोशल मिडीयावर हे आदेश प्राप्त झाल्यानंतर याची कार्यवाही सुरु झाली. मात्र ग्रामीण भागातील गावात हे आदेश पोहोचले का, गावातील दवंडी रजिस्टरला त्याची नोंद घ्यावी लागते, ती घेतली गेली का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मुख्य सचिवांच्या इंग्रजी भाषेतील आदेश मंत्री मंडळातील सदस्यांना तरी नीटसे समजले का हा प्रश्न असल्याचेही झेंडे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून सर्व आदेश ग्रामपंचायतीपर्यंत मराठीतच जायला हवा, या प्रकरणी मुख्य सचिवांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी अशी मागणी झेंडे यांनी केली आहे.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय