नगरपालिकेकडून कंबर आणि मणका तपासणी व उपचार शिबिराची मागणी

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 15 जून 2018

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिका वारंवार मागणी करूनही शहराच्या रस्त्यांवरील बेसुमार खड्ड्यांची दुरूस्ती करीत नसल्याने अॅड. सिकंदर शेख यांनी नागरिकांच्या हितासाठी 
कंबर आणि मणका तपासणी व उपचार शिबिर घेण्यासह आवश्यक उपकरणे वितरित करण्याची मागणी केली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिका वारंवार मागणी करूनही शहराच्या रस्त्यांवरील बेसुमार खड्ड्यांची दुरूस्ती करीत नसल्याने अॅड. सिकंदर शेख यांनी नागरिकांच्या हितासाठी 
कंबर आणि मणका तपासणी व उपचार शिबिर घेण्यासह आवश्यक उपकरणे वितरित करण्याची मागणी केली आहे. 

दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याकडे अॅड. सिकंदर शेख यांनी ही मागणी केली आहे. अॅड. सिकंदर शेख यांनी शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याकडे २१ सप्टेंबर २०१७ रोजी लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीसंबंधी खुलासा करताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी १७ आॅक्टोबर २०१७ च्या पत्रान्वये मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि खड्डे पडल्याचे अंशतः खरे असल्याचा अजब दावा केला होता. त्याचबरोबर तात्पुरता व तातडीचा उपाय म्हणून खड्डे बुजविण्यात येत असल्याचा त्यांनी दावा पत्रात नमूद करण्यात आला होता परंतु प्रत्यक्षात खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.

शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते कुरकुंभ मोरी आणि डॅा. आंबेडकर चौक ते जुनी नगरपालिका इमारत या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना कंबरेचे व मानेचे आजार झालेले आहेत. नगरपालिका खड्डे बुजवत नसल्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कंबर व मणका तपासणी व उपचार शिबिर घेण्याबरोबर शिबिरात माने आणि कंबरेचे पट्टे व अन्य आवश्यक उपकरणे वितरित करण्याची लेखी मागणी श्री. शेख यांनी केली आहे.

अॅड. सिकंदर शेख यांनी उपहासाने आरोग्य शिबिराची मागणी केली असली तरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक, रस्त्याच्या मधोमध वर आलेले भूयारी गटारांचे चेंबर, मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील पेव्हिंग ब्लॅाकची दयनीय अवस्था, आदींमुळे मार्गक्रमण करणे सर्वांसाठी जिकिरीचे झाले आहे. 

शहरातील खड्डे व रस्त्यांच्या दुरवस्था संबंधी नगरपालिकेकडे दीड वर्षांपासून नागरिकांनी लेखी मागणी केलेली आहे परंतु नगरपालिका टाळाटाळ करीत आहे. नगरपालिकेतील विरोधक देखील रस्त्यांच्या दुरवस्थासंबंधी सोईस्कररित्या मौन बाळगून आहेत. 

Web Title: Demand for waist and spin check and treatment camp from municipality