बारामतीमधील गाळेधारक म्हणतात...

मिलिंद संगई, बारामती
Sunday, 3 May 2020

लाॅकडाऊनच्या काळात सगळेच व्यवहार ठप्प  असल्याने सर्वांच्याच व्यवसायावर संकट आले आहे. या काळातील नगरपालिकेच्या गाळेधारकांचे जागा भाडे व घरपट्टी माफ करण्याची आता मागणी होऊ लागली आहे.

बारामती : लॉकडाऊनच्या काळात सगळेच व्यवहार ठप्प  असल्याने सर्वांच्याच व्यवसायावर संकट आले आहे. या काळातील नगरपालिकेच्या गाळेधारकांचे जागा भाडे व घरपट्टी माफ करण्याची आता मागणी होऊ लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर तसेच राष्ट्रवादीचे अँड. अमरेंद्र महाडीक यांनीही या प्रकारची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. 
दरम्यान गाळेधारकांच्या या मागणीसाठी सह्या मिळविण्याची मोहिम ऑनलाईन पध्दतीने सर्व नियम पाळून सुरु असल्याचे या बाबतच्या निवेदनात नमूद केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मार्च 2020 ते टाळेबंदी पूर्णतः संपेपर्यंतच्या काळातील सर्व कर, भाडे माफ करण्यात यावे अशी सर्वांचीच मागणी आहे. या कालावधीत कोणालाही व्यवसायच करता आलेला नसल्याने उत्पन्नाचे सर्व मार्गच खुंटले आहेत. अशा काळात भाडे व घरपट्टीचा बोजा व्यावसायिकांवर पडणार आहे. त्यामुळे वेगळ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याने याचा सहानुभूतीने विचार करुन निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

दरम्यान, दुसरीकडे लॉकडाऊन सुरु झाल्याने 31 मार्च 2020 अखेर सर्व कर व इतर शुल्क भरण्यातही नागरिकांना अडचणी निर्माण झालेल्या असल्याने या काळासाठी कोणतेही दंड किंवा शास्तीचे शुल्क आकारु नये अशीही मागणी यात करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for waiver of rent in Baramati