खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

संतोष आटोळे
गुरुवार, 24 मे 2018

शिर्सफळ - सिध्देश्वर निंबोडी (बारामती) गावाच्या पाणी पुरवठा योजनेसह आसपास गावांच्या दृष्टीने मदनवाडी तलाव महत्त्वाचा आहे. आगामी काळात गावच्या पाणी प्रश्नासह आसपासच्या परिसरातील हजारों एकरांवरील चारा पिकांसह इतर पिके धोक्यात येवु नयेत यासाठी, तसेच पाळीव, वन्यप्राणी, पक्षी यांची पाण्यावाचुन होरपळ होऊ नये म्हणुन यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या खडकवासला कालव्याच्या आर्वतनातुन वितरीका क्रमांक 36 आणि 40 मधुन मदनवाडी तलावात प्राधान्याने पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांमधुन करण्यात येत आहे.

सन 1972च्या दुष्काळात बांधण्यात आलेला व सुमारे 170 हेक्टर क्षेत्रात पसरलेला मदनवाडी तलावात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडविले जाते. त्यानंतर खडकवासला कालव्यातुन येणाऱ्या पाण्याचा आधार या तलावाला असतो. यातुन या भागाला वर्षभर पाणी पुरते. या माध्यमातुन हजारों एकरांहुन अधिक क्षेत्र सिंचना खाली आले. तसेच सिध्देश्वर निंबोडी सारख्या गावाची तहानही याच तलावातील पाण्यावर अवलंबुन असते.

सध्या तलाव कोरडा पडला आहे. फक्त काही खड्ड्यांमध्येच पाणी आहे. त्यातच शेतकऱ्यांनी चारा पिकांसह, ऊस, फळबागा आदी पिकांचे उत्पादन घेतले आहे. मात्र तलावातील पाणी साठा संपुष्टात आला आहे. यामुळे पिके धोक्यात सापडण्याची शक्यता आहे. तसेच पाळीव जनावरे, वन्यप्राणी पक्षी यांचीही पाण्यावाचुन भटकंती होणार आहे.

सध्या खडकवासला कालव्यातुन आर्वतन सोडण्यात आले आहे. या आर्वतनात तलावात प्राधान्याने पाणी सोडण्याची मागणी आहे. सिध्देश्वर निंबोडीचे सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत, पोपट खडके, संतोष नगरे यांच्यासह ग्रामस्थांकडून ही मागणी होत आहे.

याबाबत बोलताना माजी सरपंच किशोर फडतरे म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्याकडे खडकवासला कालव्यातुन तलावात प्राधान्याने पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत पाठपुरावा सुरु असुन, खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा विचार करुन मदनवाडी तलावात तात्काळ पाणी सोडावे.

Web Title: The demand for water from the canals of the Khadakwasla