मदनवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 22 जुलै 2018

भिगवण : मदनवाडी (ता.इंदापुर) येथील ब्रिटिशकालीन तलाव सध्या कोरडा पडल्यामुळे तलावावर अवलंबुन शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. मागील अनेक दिवसांपासुन तलाव कोरडा पडल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला असुन तलावांमध्ये तातडीने पाणी सोडा अन्यथा पुण्यातील सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करुन असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत संतोष सोनवणे, संजय धुमाळ, प्रमोद धुमाळ आदींसह मदनवाडी(ता.इंदापुर) व सिध्देश्वर निंबोडी(ता.बारामती) येथील शेतकऱ्यांनी मदनवाडी तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

या ब्रिटीशकालीन तलावावर मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे तसेच सिध्देश्वर निंबोडी(ता.बारामती) येथील शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना, तसेच जनावरे पाण्यासाठी अवलंबुन असतात. मागील काही दिवसांपासुन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका या भागातील शेतकऱ्यांसह पाणी योजनांना सुध्दा बसला आहे. पुर्वी वर्षातुन ठराविक कालावधीनंतर मिळाणारे अवर्तन अलीकडे बेभरवशाचे झाले आहे. सध्या मदनवाडी तलाव आटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तलावांमध्ये पाणी नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या तलावावर पिण्याच्या पाण्याच्या योजनाही आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

याबाबत संतोष सोनवणे म्हणाले, पुर्वी मदनवाडी तलावांमध्ये नियमित पाणी सोडले जात होते परंतु अलीकडच्या काळात पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या तलावांमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तलावांमध्ये तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Demand for water release in Madanwadi lake