अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या मागण्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे : 'तमाशा फडांना गृहविभागाकडून संरक्षण मिळावे', 'तमाशा फडाना महामार्गावरील टोल मोफत करावा ' , 'तमाशा फडाना अनुदान द्यावे' आणि ' तमाशा संघटनेच्या परवानगीशिवाय सरकारने तमाशा फडाबद्दल आणि कलावंतांबद्दल स्वतः निर्णय घेऊ नये' अशा विविध मागण्या अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीतर नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा परिषदेने दिला आहे. 

या परिषदेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची माहिती देण्यासाठी ही परिषद घेतली. परिषदेच्या अध्यक्षपदी अविष्कार मुळे, उपाध्यक्षपदी मोहित नारायणगावकर आणि मांडा पिंपळेकर यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी किरणकुमार ढवळपुरीकर आणि कार्याध्यक्षपदी मयूर महाजन यांची निवड झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी तमाशा कलावंत आणि तमाशा फडाच्या विविध 21 मागण्या मांडण्यात आल्या. तमाशा कलेला राज्यआश्रय मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी परिषदेने केली. 

याबाबत पिंपळेकर म्हणाल्या,"तमाशा कलावंतांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. तमाशा कलावंताच्या प्रश्न सोडवावे. फड मालक हेच कलाकार आहेत. काही कलावंतावर आज भीक मागण्याची परिस्थिती आली आहे. लोककला जिवंत राहण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.  प्रत्येक फडाला सरकारने 30 लाख अनुदान प्रतिवर्षी द्यावे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही मागण्या मांडत आहोत . पण, सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. "

Web Title: The demands of All India Marathi Tamasha Conference