सुदृढ लोकशाहीसाठी कटिबद्ध

Vote
Vote

पुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयातील तरुणांनी मतदानाची शपथ घेतली.

‘सकाळ’च्या आय विल व्होट या उपक्रमात शपथ घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. महाविद्यालयाचे कॅंपस डायरेक्‍टर डॉ. वसंत बुगडे, प्राचार्य डॉ. एम. जी. जाधव, तहसीलदार स्मिता पवार, प्रा. उल्हास माळवदे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगून आपला हक्क बजावण्यास आवाहन केले.

शुभम जायभाय : भारतातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर मतदान करणे आवश्‍यक आहे. आम्हा तरुणांची ही जबाबदारी आहे, याचे भान आम्हाला आहे. त्यामुळे मतदान करणारच.

तुषार बरवे : लोकशाहीत सर्व गोष्टीचे मूळ राजकारण असेल, तर चांगल्या बदलाच्या मुळाशी मतदान असते. त्यामुळे सक्षम भारतासाठी मी मतदान करणार आहे.

स्मिता पवार (तहसीलदार) : मतदानाचा दिवस सुटीचा नाही, तर तो कर्तव्य बजावण्याचा असतो, याचा विसर पडू देऊ नका. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

स्वप्नाली खरात : मतदान करून चांगले सरकार निवडले तर समाजातील अनेक प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे माझ्याजवळच्या सर्वांना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहे.

डॉ. वसंत बुगडे (संचालक) : जेएसपीएम महाविद्यालय नेहमीच सामाजिक उपक्रम करीत असते. आय विल व्होट या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत आहे.

डॉ. एम. जी. जाधव (प्राचार्य) : मतदानापासून दूर राहणे आपल्याला बरे वाटते; पण आपण आयुष्यातील ही खूप मोठी चूक असते. उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com