esakal | मुक्तीच्या शिक्षणातूनच लोकशाही फुलेल : सोनवणे
sakal

बोलून बातमी शोधा

Democracy

मुक्तीच्या शिक्षणातूनच लोकशाही फुलेल : सोनवणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : ज्या व्यवस्थेत लोकांना गप्प बसायला सांगितले जाते, तेथे लोकशाही नांदणे अवघड आहे. मुक्तीच्या शिक्षणातूनच लोकशाही फुलेल, असे सांगणाऱ्या डॉ. गी बाबांच्या विचारांचा प्रसार करणे हेच आमचे जीवन ध्येय बनले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम सोनवणे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: पुणे : तिसऱ्या लाटेची तयारी, जम्बोला मान्यता

मानववंश शास्त्राचे अभ्यासक डॉ. गी प्वॉत्व्ह यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होत्या. चेंज इंडियाचे सचिन धनकुडे, संदीप कुंबरे, मारोती माने, हरिभाऊ सणस, रमेश उभे, विजय भोडेकर, लता भोर, नेताजी खंडागळे, प्रा. श्याम धुमाळ, शिवाजी शेळके उपस्थित होते.

सोनवणे म्हणाल्या, ‘शेतकरी, महिला, आदिवासी, वंचित समाज बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी क्रियाशील नागरिक घडण्याची गरज आहे. स्वयंशिक्षण कार्यशाळा, सहकारी सामाजिक संशोधन केंद्र, गरीब डोंगरी संघटना आदी माध्यमातून डॉ. गी यांनी आपल्या विचारांचा ठसा समाज मनावर उमटवला. संत तुकाराम, संत जनाबाई, महात्मा फुले यांच्या साहित्या बरोबरचअनेक दलित आत्मकथनांचे भाषांतर डॉ. गी यांनी केले. जनजागरण हे त्यांनी लिहिलेले पुस्तक ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असे आहे.

हेही वाचा: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांना सहा महिन्यासाठी तडीपार

गरीब डोंगरी संघटनेचे कार्यकर्ते शिदू शेजवळ, लीलाबाई कांबळे, बबन खांडभोर, बबन धनवे, वैजीनाथ गायकवाड आदींनी या वेळी आपले विचार मांडले. सुनंदा कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दत्ता शिंदे यांनी स्वागत केले. सोनाली मैड यांनी आभार मानले.

loading image
go to top