वडमुखवाडी, मोशीत 11 अनधिकृत बांधकामे पाडली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

या कारवाईत आरसीसी आणि वीटांमधील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 25 मजूर, एक पोलीस निरीक्षक, 2 पीएसआय, 45 पोलीस कर्मचारी, 3 जेसीबी, 3 ब्रेकर, 1 पोकलेन, 1 डंपर यांचा समावेश राहिला.​

पिंपरी : वडमुखवाडी, मोशी व बोऱ्हाडेवाडी येथील रहिवासी आणि (रेडझोन) संरक्षित क्षेत्रामध्ये नव्याने सुरु असलेल्या सुमारे 19 हजार चौरस फूटांवरील 11 अनधिकृत बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पाडली. 

पिंपरीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट;13 वर्षीय चिमुकल्यासह तीन जण जखमी 

ई व क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.2 व 3 मध्ये अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरसीसी आणि वीटांमधील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 25 मजूर, एक पोलीस निरीक्षक, 2 पीएसआय, 45 पोलीस कर्मचारी, 3 जेसीबी, 3 ब्रेकर, 1 पोकलेन, 1 डंपर यांचा समावेश राहिला.

Video : पबजीमुळे अजित पवारला लागलं वेड!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demolished 11 unauthorized construction in Wadmukhwadi and Moshi