Video : पबजीमुळे अजित पवारला लागलं वेड!

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या २५ वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे.

une-news" target="_blank">पुणे) : पबजी (PUBG) या गेमचं तरुणाईला अक्षरश: वेड लागलं आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकणमध्ये याचा प्रत्यय आला आहे . पबजी गेम मुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलिस पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेपेक्षा त्या तरुणाच्या नावामुळे ही घटना जास्त चर्चेत आली आहे. संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची तयारी सुरू केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय घडलं अजित सोबत?
अजित शिवाजी पवार असे या तरुणाचे नाव असून, सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या २५ वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. अजित गावात पबजी गेम मधील सगळ्या अॅक्शन करत गावात फिरत होता. तसेच तो गावात नागिरकांना दगडं मारत फिरत होता. अजित मुळचा टेंभुर्णी (सोलापूर जिल्हा) येथील आहे, चाकणमधील नागरिकांना त्याला पोलिस ठाण्यात आणलं आहे. त्याच्या वडिलांना या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचे चाकणचे पोलिस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांनी दिली. स्वतःचा मोबाईल त्यानं स्वतः दगडांनी फोडला. मित्रांना भेटून म्हणाला, मला दोनशे माणसे मारायला आली आहेत. अजित रस्त्यांवर मुलांच्या सायकलींवर बसायचा आणि त्यांना त्रास देत होता. एका मिनिटांत अख्खी बिल्डिंग उडवून टाकतो, असं म्हणायचा, अशी माहिती त्याच्या मित्रांनी चाकण पोलिस ठाण्याबाहेर मीडियाशी बोलताना दिली.

आणखी वाचा - मृत्यूनतर जिमेलचं काय होतं?

आणखी वाचा - मोबाईल डेटा कसा वाचवाल?

पबजीवरच्या बंदीचं काय?
गेल्या काही दिवसांपासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. पण, अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरू असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. एवढंच नव्हे तर अनेक जण हे या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy played pubg for 15 days falls sick in chakan city