पिंपरीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट;13 वर्षीय चिमुकल्यासह तीन जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मोठा आवाज झाल्याने शेजारील रहिवाशांनी स्फोट झालेल्या घराकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत घरात पडलेल्या तिघांनाही उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले.

पिंपरी : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने तेरा वर्षीय चिमुकल्यासह तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना भोसरीतील संत तुकाराम नगर बुधवारी (ता. 4) सकाळी घडली.

Video : पबजीमुळे अजित पवारला लागलं वेड!

या घटनेत घरातील एक महिला गंभीर जखमी असून एक पुरुष व तेरा वर्षीय मुलगा किरकोळ जखमी आहेत. मोठा आवाज झाल्याने शेजारील रहिवाशांनी स्फोट झालेल्या घराकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत घरात पडलेल्या तिघांनाही उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवनाही घटनास्थळी दाखल झाले.

मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three injured in Explosion of domestic gas cylinder in Pimpri