बारामतीत राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये आक्रमक
गोविंदबाग निवासस्थानाबाहेर उपस्थित राष्ट्रवादीच्या महिला
गोविंदबाग निवासस्थानाबाहेर उपस्थित राष्ट्रवादीच्या महिलाSakal

बारामती - एसटी कर्मचारी संघटनेचे बारामतीत आंदोलन काही झाले नाही, मात्र या पुढील काळात पवार कुटुंबियावरील आरोप सहन करुन घेतले जाणार नाहीत, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा आक्रमक पध्दतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घतली आहे. या निमित्ताने आज राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, खरा प्रत्यक्षात बारामतीत आज कोणीही फिरकले नाही. सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोविंदबाग निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. कडक पोलिस बंदोबस्तही येथे तैनात होता. सकाळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

आंदोलनाची शक्यता धूसर असल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते घटनास्थळी आले, त्यांनी पुरेसा बंदोबस्त तैनात केलेला असून पोलिस कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाहीत ही ग्वाही दिल्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले. पुरुष कार्यकर्त्यांसोबत आज महिला भगिनीही उपस्थित होत्या. दरम्यान या पुढील काळात बाहेरच्या कोणी बारामतीत येऊन पवार कुटुंबियांची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेणार नाही, जशास तसे उत्तर त्याला दिले जाईल, असा इशारा अनेक युवा कार्यकर्त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिला अध्यक्षा वनिता बनकर व अनिता गायकवाड यांच्यासह संघटनेतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

साध्या कपड्यातील पोलिसांची गस्त...

आज शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा गनिमी कावा पध्दतीने अचानकच आंदोलन होऊ नये या साठी साध्या वेशातील पोलिसांची शहरभर गस्त सुरु होती. वरिष्ठ अधिकारीही शहरावर लक्ष ठेवून होते. बारामतीत आंदोलन काही झालेच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com