अचानक दंगल भडकते तेव्हा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

वाघोली - 'ओ निली पॅंट और सफेद शर्टवाला दंगल भडका रहा है. वही अपना टार्गेट है. पोझिशन लो. मेरे ऑर्डर पे फायर होगा... फायर...' बंदुकीचे ट्रिगर ओढल्याचा आवाज येतो. हे चित्रपटातील दृश्‍य नव्हे, तर पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक होते. वाघोलीतील आव्हाळवाडी चौकात शनिवारी पोलिसांनी हे सादर केले. 

जातीय दंगल निर्माण झाल्यास परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण कसे मिळविता येईल, याचे प्रात्यक्षिक पुणे ग्रामीण व लोणीकंद पोलिसांच्या वतीने घेण्यात आले. प्रात्यक्षिकापूर्वी गावातून संचलन करण्यात आले. यानंतर आव्हाळवाडी फाटा चौकात दंगल निर्माण झाल्यानंतर त्याला सामोरे कसे जायचे, केव्हा लाठीचार्ज करायचा, वेळप्रसंगी गोळीबार व जखमींना वैद्यकीय मदत कशी करायची, आदी प्रात्यक्षिके या वेळी सादर करण्यात आली. यामध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. जमावाच्या घोषणा, दगडफेक हे प्रसंगही सादर करण्यात आले. जणू एखाद्या चित्रपटाचे दृश्‍य जाणवत होते. 

हेल्मेटधारी पोलिसांची गर्दी, बंदुकधारी पोलिस अचानक रस्त्यावर दिसल्याने नागरिकही गोंधाळात पडले. हे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्‍वाःस सोडत, ते पाहण्यासाठी गर्दी केली. या वेळी लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, सुधीर तोरडमल, उपनिरीक्षक अनुराधा भालेराव आदी उपस्थित होते. 

Web Title: Demonstration of riot control police squad