‘डेमू’ अखेर धावली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता दौंड- पुणे- दौंड रेल्वे डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डिईएमयू) सेवा प्रजासत्ताक दिनी सुरू झाली आहे. सुमारे ३११ दिवसांनी शटल सेवा सुरू झाली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ३११ दिवसांनी शटल सेवा सुरू
पुणे - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता दौंड- पुणे- दौंड रेल्वे डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डिईएमयू) सेवा प्रजासत्ताक दिनी सुरू झाली आहे. सुमारे ३११ दिवसांनी शटल सेवा सुरू झाली आहे.

दौंड रेल्वे स्थानक येथे मंगळवारी (ता. २६) सकाळी शटल सेवा पुन्हा सुरू झाली. आमदार राहुल कुल, दौंड- पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एच. एल. मीना आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. दररोज या सेवेच्या चार फेऱ्या होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या ई- पासधारकांनाच प्रवास करता येणार आहे. दौंड- पुणे दरम्यानच्या पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर येथे थांबे आहेत.

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार

दौंड- पुणे- दौंड या प्रवासी मार्गावर २२ मार्च २०२० पासून शटल व डिईएमयू सेवा बंद आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता शटल सुरू झाल्याने दैनंदिन प्रवाशांकरिता देखील नियमित शटल, डिईएमयू व पॅसेंजर सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!

ई- पासची प्रक्रिया
ई- पास करिता www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. पासकरिता कार्यालयाचे पत्र, सचित्र ओळखपत्र, फिटनेस सर्टिफिकेट, छायाचित्रासह माहिती अर्जदाराने ऑनलाइन भरून द्यायची आहे. पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत प्राप्त अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदाराला प्रवासासाठीचा क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) आधारित ई- पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demu finally ran on pune to daund