सावधान! डेंग्यूसह चिकनगुन्याच्या रूग्णसंख्येत राज्यात पुणे प्रथम

पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे
Dengue patients
Dengue patientssakal media

पुणे : सध्या महाराष्ट्रात डेंग्यूच्या (Dengue) रूग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळा हा डेंग्यूची साथ पसरण्यास अनुकूल कालावधी असतो. दरम्यान महाराष्ट्रातील एकूण रूग्णसंख्येतील सर्वांत जास्त रूग्ण हे पुण्यात आहेत. या वर्षातील जूनच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. राज्यभरात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ही ११४६ इतकी आहे. त्यापैकी जवळपास ३०५ रूग्ण हे पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. त्याबरोबरच चिकनगुन्याच्या (Chikungunya) रूग्णसंख्येतही पुणे टॉपवर आहे.

(Pune Dengue Patient Update)

पुण्यातील डेंग्यू रूग्णांची संख्या ही इतर जिल्ह्यातील रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. दरम्यान लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा जास्त रूग्ण आहेत. राज्यभरात एकाही डेंग्यू रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. दरम्यान पुण्यातील एकूण रूग्णांपैकी १४७ रूग्ण हे शहरातील, १३७ रूग्ण हे जिल्ह्यातील आणि २७ रूग्ण पिंपरी चिंचवड शहरात आहेत.

Dengue patients
पर्यटक थोडक्यात बचावले; पाहा धडकी भरवणारा हिमस्खलनाचा Video

तर कोल्हापूर शहर दुसऱ्या क्रमांकावर असून तेथील एकूण रूग्णांची संख्या १५७ आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महापालिकेचा नंबर लागला असून तेथे ११७ रूग्ण आहेत. चौथ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा असून तेथे एकूण ९२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर पालघर, सातारा, नाशिक, ठाणे या जिल्ह्याचा नंबर लागला आहे. दरम्यान मागच्या वर्षी जूनमध्ये राज्यात ९६१ रूग्ण होते.

पुणे शहरात सध्या १४७ रूग्ण आहेत पण त्याचबरोबर चिकनगुन्यातही पुणे शहर प्रथम क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात चिकनगुन्याचे एकूण १८७ रूग्ण आहेत. त्यापैकी ११२ रूग्ण शहरात आणि ग्रामीण भागात ७३ रूग्ण आहेत त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात चिकनगुन्याचे २ रूग्ण आहेत. चिकनगुन्याच्या रूग्णसंख्येतही पुणे जिल्हा सध्या टॉपवर आहे. त्यानंतर कोल्हापूर ११३, सातारा २४, सांगली २२ या जिल्ह्यांचा सामावेश आहे.

Dengue patients
पिकनिक बेतली जिवावर; डोंबिवलीतील दोघांचा नदीत बुडून मृत्यू

दरम्यान, डेंग्यू आणि चिकनगुन्या या दोन्हीमध्ये पुणे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पावसामुळे हे साथीचे रोग वेगाने पसरत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com