सणसरला विद्यार्थ्यांकडून डेंगीची 24 उत्पत्तिस्थाने नष्ट (व्हिडिओ)

भवानीनगर (ता. इंदापूर) ः डेंगी निर्मूलन मोहिमेअंतर्गत पाणी साठवणुकीच्या भांड्यांची तपासणी करताना विद्यार्थी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी.
भवानीनगर (ता. इंदापूर) ः डेंगी निर्मूलन मोहिमेअंतर्गत पाणी साठवणुकीच्या भांड्यांची तपासणी करताना विद्यार्थी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी.

भवानीनगर (पुणे): जिल्ह्यात चर्चिला जात असलेल्या सणसर (ता. इंदापूर) डेंगी निर्मूलन मोहिमेस आज सुरवात झाली. भवानीनगरमधील तपासणीनंतर ती उद्या (ता. 12) पूर्ण होणार आहे. आज दिवसभरात सणसर व गावच्या 12 वाड्या-वस्त्यांवरील 893 कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 2 हजार 163 पाणी साठवणुकीची भांडी तपासली. तब्बल 24 घरांत डेंगीच्या अळ्या आढळल्या.

सणसरमध्ये आज डेंगी निर्मूलन मोहिमेत 150 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह आरोग्य खात्याचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून 200 जणांनी 26 पथके तयार करून आज अडीच किलोमीटर अंतरातील घरांची तपासणी केली. पहिल्याच दिवशी उत्साही विद्यार्थ्यांनी 2 हजार 163 पाणी साठवणुकीची भांडी तपासली. त्या-त्या कुटुंबांतील लोकांना डेंगी व स्वाइन फ्लूची माहिती व प्रतिबंधक उपाययोजना याविषयी माहिती दिली. अत्यंत नियोजनबद्धरीत्या ही मोहीम झाली. सणसर गावातील डेंगीची उत्पत्तिस्थाने एकाच वेळी नष्ट झाल्याने डेंगी रोखण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे सरपंच संध्या काळे व उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी सांगितले. आता ग्रामपंचायत व आरोग्य विभाग या परिसरात धुरळणी करणार आहे.

मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी विद्यार्थ्यांच्या मदतीने डेंगी रोखण्याचा सणसर पॅटर्न यशस्वी झाला. छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या शाखेतील विद्यार्थी आज स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी झाले होते. तब्बल 26 पथके व तीन रुग्णवाहिका या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे प्राध्यापकही पथकात सहभागी होते. सणसरच्या सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, माजी सरपंच राहुल काळे, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य भापकर, सणसर विकास मंचाचे पुष्पराज निंबाळकर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी दिलीप जगताप, सणसरचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिवाजी कोथमिरे, पद्माकर धर्माधिकारी, प्रमोद पाठक, राहुल घुले, अविनाश चौधर, पोपट देवकर, पोपट लंबाते, योगीनाथ घोडके यांनी मोहिमेचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com