आळंदीत आढळले डेंगीचे दोन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

आळंदी - शहरात वडगाव रस्ता भागात डेंगीच्या तापाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या महिनाभरात डेंगीच्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढूनही पालिकेने प्रभावीपणे धुरळणी यंत्रे आणि जंतुनाशक पावडर फवारली नसल्याने शहर स्वच्छतेत प्रशासन कुचकामी ठरत आहे.

गेल्या महिनाभरात आळंदीत डेंगी आणि डेंगीसदृश तापाचे पन्नासहून अधिक रुग्ण आढळले. अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मागील आठवड्यात डेंगीबरोबरच चिकुनगुनियासदृश तापाची लागण झालेल्या मरकळ रस्त्यावरील एकाच घरातील दोघांना दाखल केले होते; तर सध्या वडगाव रस्त्यावरील आणखी दोघे डेंगीच्या तापाने आजारी आहेत. यापैकी एक मुलगी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, दुसरी आळंदीत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

Web Title: dengue patient sickness