जुनी सांगवीत डेंग्यू प्रतिबंधात्मक औषध फवारणी

रमेश मोरे
शनिवार, 19 मे 2018

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३२ (सांगवी-नवी सांगवी) येथील मुळानगर, लक्ष्मीनगर, पवारनगर, सांगवी गावठाण आदी परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली.

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३२ (सांगवी-नवी सांगवी) येथील मुळानगर, लक्ष्मीनगर, पवारनगर, सांगवी गावठाण आदी परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली.

'राष्ट्रीय डेंग्यू सप्ताह' निमित्त पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दि.१५ मे ते दि २५ मे दरम्यान "पाणीसाठे, कंटेनर सर्वेक्षण" पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविले जात आहे. 
सोना-मोना अपार्टमेंट परिसरातुन प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती मोहिमेस सुरूवात करण्यात आली. स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांनी या मोहिमेत सहभाग घेत. नागरीकांना घर परिसर स्वच्छतेबाबत आवाहन केले. पाणी साठे, अडगळीत पडलेले साहित्य, साठुन राहिलेले पाणी यामुळे डासांची पैदास होते. हे रोखण्यासाठी वेळोवेळी पाणी साठे स्वच्छ करावे. घर व परिसर स्वच्छतेची काळजी घ्यावी याबाबत नागरीकांना माहिती पत्रके वाटण्यात आली.

आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागाचे एम.पी.
डब्ल्यू. ए.बी. तोडकरी, कंटेनर सर्वेक्षण प्रवीण गायकवाड, औषध फवारणी कर्मचारी जयप्रकाश जाधव, कल्याणी असटंगे, संतोष गोरे आदींनी या मोहिमेत सहभागी घेतला.
 फोटो ओळ- जुनी सांगवी प्रभागात "राष्ट्रीय डेंग्यु सप्ताहानिमित्त प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करताना पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी.

Web Title: Dengue preventive medicine spray in juni sanghvi