डेंगीच्या तापाने पुणेकर आता अशक्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

राज्यात गेल्या वर्षी डेंगीचा सर्वाधिक डंख पुण्याला झाला होता. राज्यात २०१९ मध्ये एक लाख ४८ हजार ८८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौदाशे रुग्णांचे निदान एकट्या पुण्यात होते. पुणे जिल्ह्यांत ही संख्या ९७२ होती. त्यामुळे राज्यात सर्वाधिक डेंगीच्या रुग्णांची संख्या पुण्यात होती. या पार्श्वभूमीवर या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले.

पुणे - डेंगीच्या तापाने पुणेकर आता अशक्त झाले आहेत. गेल्या दहा महिन्यांमधील सर्वाधिक डेंगीच्या रुग्णांची संख्या गेल्या २८ दिवसांमध्ये महापालिकेच्या दफ्तरात नोंदली गेली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात गेल्या वर्षी डेंगीचा सर्वाधिक डंख पुण्याला झाला होता. राज्यात २०१९ मध्ये एक लाख ४८ हजार ८८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौदाशे रुग्णांचे निदान एकट्या पुण्यात होते. पुणे जिल्ह्यांत ही संख्या ९७२ होती. त्यामुळे राज्यात सर्वाधिक डेंगीच्या रुग्णांची संख्या पुण्यात होती. या पार्श्वभूमीवर या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले. 

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

पुण्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये डेंगीचा संशय असलेल्या एक हजार ३५९ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी डेंगीचे निश्‍चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५७ आहे. त्यापैकी नऊ महिन्यांमध्ये १७ रुग्णांची नोंद झाली तर, गेल्या २८ दिवसांमध्ये ४० रुग्णांचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

शहरात गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पण, त्याचवेळी पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यावर एडिस इजिप्ती डास अंडी घालतो. त्यातून डासांचा फैलाव होतो. ही डासोत्पत्तीची ठिकाणे आता बांधकामे, भंगार साहित्य, टायर, सरकारी इमारती येथे नसून, ती घरांमध्ये आहेत. फ्रिजच्या मागील पाणी साठण्याचा ट्रे, फुलदाणी, वातानुकूलित यंत्रणा अशा ठिकाणी साठणाऱ्या स्वच्छ पाण्यात या डासांची अंडी सापडत आहेत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

सोसायट्यांमधील बंद घरांची गच्ची, इमारतीच्या छतावर ठेवलेले भंगार साहित्य, राहत्या घरातील टेरेसवर ठेवलेल्या साहित्यांमध्ये साचलेल्या पाण्यातही डासांची अंडी सापडत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन गांधी म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांमध्ये डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह येते. पण, औषधे देऊनही ताप कमी होत नाही. अशा रुग्णांना डेंगी झाल्याचे निदान होते. अशा वेळी पॅरासिटमॉल वगळता इतर कोणतेही वेदनाशामक औषध घेऊ नये.’’

का वाढला डेंगी?

  • ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत पडलेला पाऊस
  • सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती
  • घराच्या परिसरात साचलेले पावसाचे स्वच्छ पाणी

पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, या महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे डेंगी नियंत्रणाचे उपाय तातडीने हाती घेतले जातील. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Sickness Patient increase in pune