महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी दररोज 160 जादा बसेस एसटीमार्फत सोडण्यात येणार आहे.

पुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.

'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​

शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी दररोज 160 जादा बसेस एसटीमार्फत सोडण्यात येणार आहे. राज्यात एक हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पुणे विभागातील 160 जादा बसेस 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मार्गस्थ होणार आहे. यासाठी महामंडळाच्या वेबसाइटवरून किंवा मोबाईल ऍपवरून तिकीट आरक्षित करता येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक कार्यालयाने दिली.

मोठी बातमी: औंध संस्थानच्या गायत्रीदेवींची फसवणूक; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल​

बसस्थानक आणि तेथून कोणत्या ठिकाणी गाडी जाणार :
शिवाजीनगर : नाशिक, औरंगाबाद, नागपूर अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, घोपडा, धुळे, हिंगोली, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, यवतमाळ, बुलढाणासाठी जादा बस सुटणार आहेत.
पिंपरी-चिंचवड : नियमित सुटणाऱ्या बस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, गणपतीपुळे, महाड, दापोली, लातूरसाठी जादा बस.
स्वारगेट : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती, भोर मार्गावर जादा बस धावतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Diwali 160 extra buses will be released from Pune to various parts of the state through ST