esakal | अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Online_Exam

साधारणपणे पारंपरिक पदवीसह फार्मसी, इंजिनिअरिंगच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांचे एक आणि त्यापेक्षा जास्त विषय बॅकलॉग राहिले आहेत. पुणे विद्यापीठातील ही संख्या किमान 3 लाख असण्याची शक्‍यता आहे. ​

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : गेल्या सात महिन्यांपासून ज्या विद्यार्थ्यांचे गत वर्षाचे/सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा कोरोनामुळे खोळंबल्या होत्या. अखेर या परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. दिवाळीनंतर या परीक्षा होणार असून, या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्याचे आव्हान विद्यापीठापुढे आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक बुधवारी (ता.२८) पार पडली. त्यामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा, बॅगलॉगची परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या​

कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील कामगिरीवरून सरासरी गुण देऊन पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठ कायद्यानुसार बॅकलॉगच्या परीक्षा रद्द करता येत नसल्याने ही परीक्षा कधी होणार हे गेल्या तीनचार महिन्यात स्पष्ट केले नव्हते. ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला आहे, त्यांच्या बॅकलॉगची परीक्षा 120 दिवसात घेणे अनिवार्य आहे. या परीक्षा कधी होणार याबाबत 'सकाळ'ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते.

'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​

साधारणपणे पारंपरिक पदवीसह फार्मसी, इंजिनिअरिंगच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांचे एक आणि त्यापेक्षा जास्त विषय बॅकलॉग राहिले आहेत. पुणे विद्यापीठातील ही संख्या किमान 3 लाख असण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठाने सध्या अडीच लाख अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरवात केली. ऑनलाइन आणि एमसीक्‍यू पद्धतीच्या परीक्षेत अनेक अडचणींना विद्यापीठास तोंड द्यावे लागले आहे. मात्र, कमी वेळात जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी पुन्हा एकदा याच पद्धतीचा अवलंब विद्यापीठाला करावा लागणार आहे. तसेच सरासरी गुणांवर पुढच्या वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 17 हजार विद्यार्थी या गुणांवर समाधानी नाहीत. त्यांनी श्रेणी सुधारसाठी अर्ज केला आहे. त्यांचीही यासोबत परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल​

"अंतिम वर्षाच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत, ज्यांनी गुगल फॉर्मद्वारे त्यांची तक्रार नोंदविली आहे अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे. 120 दिवसात बॅकलॉगच्या परीक्षा घेणे आवश्‍यक असल्याने या परीक्षा देखील 'एमसीक्‍यू' आणि ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.''
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

बॅकलॉग परीक्षेसाठी हे करावे लागणार
- बॅकलॉच्या परीक्षेसाठी प्रश्‍नसंच काढावे लागणार
- भाषांतर, प्रश्‍न आणि पर्याय, प्रश्‍नांमधील आकृती याच्या चुका टाळाव्या लागणार
- लॉगइन, पेपर सबमीट होणे या तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागणार
- वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे आणि पेपर अपलोड करणे यासाठी पूर्वतयारी आवश्‍यक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image